
पुणे : राज्याच्या काही जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. विविध ठिकाणांवर उद्या वादळी पावसाची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याचे (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने म्हटले आहे.