सकाळी कडक उन्ह असताना अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांना चांगलेच गोंधळात टाकले. मध्यवर्ती पुणे शहरात जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली, तर काही भागांत हलक्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पुणे आणि राज्यातील इतर भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.