Pune News : महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख; प्रमाणपत्रासाठी १.०५ लाख अर्ज, यवतमाळ सर्वाधिक; पुण्यात ३,६८७ अर्ज

शेती आणि शेतीपूरक व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र अधिकृत ओळख देण्यात येणार आहे.
Maharashtra Women Farmers Empowerment Act, 2026

Maharashtra Women Farmers Empowerment Act, 2026

sakal

Updated on

- नरेंद्र साठे

पुणे - शेती आणि शेतीपूरक व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र अधिकृत ओळख देण्यात येणार आहे. त्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्राचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रमाणपत्रासाठी राज्यातून आत्तापर्यंत एक लाख पाच हजार ४१६ अर्ज कृषी विभागाकडे आले आहेत. महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा स्वतंत्रपणे लाभ मिळावा, हा त्यामागचा उद्देश आहे. कृषी सेवा, कर्ज, विमा आणि अन्य योजनांसाठी त्यांची अधिकृत नोंदही या माध्यमातून होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com