
New Ambulances
Sakal
पुणे : राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या प्रकल्पाअंतर्गत ‘सुमीत एसएसजी’, ‘अपोलो हॉस्पिटल्सच्या ‘यूअरलाइफ’ आणि ‘अपोलो मेडस्किल्स’च्या माध्यमातून मोफत आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस १०८) नोव्हेंबरपासून सुरू होईल. या अंतर्गत राज्यात एक हजार ७५६ अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णवाहिका खरेदी करून त्याद्वारे तातडीच्या रुग्णांना सरकारी रुग्णालयात मोफत सेवा पुरविली जाईल, अशी माहिती ‘सुमीत एसएसजी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधांशू करंदीकर यांनी दिली.