
पुणे : भिलार या पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातील पहिले ‘व्यंग्यचित्रांचे गाव’ साकार होत आहे. युवा व्यंग्यचित्रकार धनराज गरड यांनी त्यांच्या ‘युवा संसद’ या सामाजिक संस्थेच्या वतीने मांडलेली ही संकल्पना पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील गोऱ्हे बुद्रुक गावाच्या ग्रामपंचायतीने स्वीकारली असून लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे.