Blue Potato : महाराष्ट्रातील पहिलाच यशस्वी प्रयोग! मंचरच्या शेतकऱ्याने घेतले शुगर फ्री निळ्या बटाट्याचे उत्पादन

शेतकरी शांताराम लिंबाजी थोरात यांनी औषधी गुणधर्म असणाऱ्या शुगर-फ्री कुफरी निळकंठ जातीच्या निळ्या बटाटा वाणाचे दीड टन उत्पादन घेतले.
Shantaram Thorat with Blue Potato
Shantaram Thorat with Blue Potatosakal
Updated on

मंचर - शेतकरी शांताराम लिंबाजी थोरात यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथे पाच गुंठे क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर औषधी गुणधर्म असणाऱ्या शुगर-फ्री कुफरी निळकंठ जातीच्या निळ्या बटाटा वाणाचे दीड टन उत्पादन घेतले आहे. महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे.

विशेष करून हृदयरोग व मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा बटाटा आहारात वापरला जातो. या भागातील अनेक बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित झालेले निळ्या रंगाचे बटाटे पाहण्यासाठी गर्दी केली होती.

शांताराम थोरात यांचा गेल्या चार पिढ्यांपासून मंचर येथे बटाटा वाणाचा व्यवसाय असून या पिकाविषयी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

थोरात म्हणाले 'अर्धी ट्रॉली शेणखत, दहा गोणी (३०० किलो) कोंबड खत टाकून शेतीची मशागत केली. सव्वा चार फुट बाय सव्वा चार फुट आकारचे बेड तयार केले. सहा इंच अंतरावर लहान गोळी आकाराच्या बटाट्याची लागवड ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली. त्यावेळी ५० किलोचे रासायनिक खत वापरले.

लागवड केल्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले. २५व्या दिवशी खुरपणी केली. एक महिन्यानंतर जोमदार वाढीसाठी वीस किलो रासायनिक खत वापरले. बुरशीनाशक व कीटकनाशकाची एक फवारणी केली. सव्वा महिन्यानंतर पीक फुलोऱ्यात आले. तीन महिन्यानंतर पीक काढणी केली. १५० ग्राम ते १७५ ग्राम वाजनाचे बटाटे आहेत.

एक हजार ६०० किलो उत्पादन निघाले. प्रती किलोला १२ ते १४ रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. लागवड, मजुरी, फवारणी खते सर्व एकूण नऊ हजार रुपये खर्च झाला. बारा हजार रुपये नफा झाला. याकामी पत्नी संगिता यांची साथ मिळाली.'

'शुगर फ्री बटाटा उत्पादन घेण्याबाबत वर्षभर अभ्यास केला. दोन वर्षापासून कानपूर (उत्तरप्रदेश) येथे काही शेतकरी उत्पादन घेत आहेत. ज्यामध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण कमी असते. मधुमेह रुग्ण आणि आरोग्याबाबत जागरूक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. पण याबाबत अजून जनजागृती नसल्याने इतर बटाट्याप्रमाणेच या बटाट्याला सर्वसाधारण बाजारभाव मिळाला. या बटाट्याविषयी जनजागृती झाल्यास सर्वसाधारण बटाट्यापेक्षा तीन ते चार पटीने अधिक बाजारभाव मिळू शकतो.'

- शांताराम लिंबाजी थोरात, बटाटा उत्पादक शेतकरी मंचर (ता. आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com