महर्षी कर्वेंचा पुतळा अवतरला, पण...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

कोथरूड - गेल्या दोन वर्षांपासून अज्ञातवासात गेलेला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पूर्णाकृती पुतळा बुधवारी (ता. १२) रात्री उशिरा कोथरूडमधील कर्वे स्मारक चौकामध्ये अवतरला. मात्र स्मारकाचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, स्मारकाचे काम पूर्ण करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या वतीने महर्षी कर्वे यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने, महर्षी कर्वे यांचा कर्वे स्मारक चौकातील पुतळा हलवला होता. गेल्या दोन वर्षांपासून या स्मारकाचे नूतनीकरणाचे काम सुरू असून ते अद्यापही रखडले आहे.

याबाबत ‘सकाळ’ने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आणि समाजमाध्यमातून चौफेर टीका झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या वतीने कर्वे स्मारकाच्या कामाला गती देण्यात आली. बुधवारी रात्री, महर्षी कर्वे यांचा कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ठेवण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा कर्वे स्मारक चौकात जागेवर ठेवण्यात आला. स्मारकाचे काम पूर्ण झालेले नसतानाच, पुतळा आणून बसविण्यात आला.

याबाबत बोलताना महापालिकेच्या वनविभागाचे अधिकारी शिवाजी लंके म्हणाले, ‘या स्मारकाचे काम निधीअभावी रखडले होते. मात्र स्थानिक नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर स्मारकाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. दरम्यान, स्मारकाचे काम करणारा वास्तुविशारद या कामाला विलंब लावत आहे. मात्र आम्ही त्यास एक महिन्याच्या आत या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महिनाभरात स्मारकाचे काम पूर्ण होईल,’ असाही पवित्रा त्यांनी घेतला.

कर्वे स्मारकासाठी मी निधी उपलब्ध करून दिला आहे. हे काम तातडीने पूर्ण व्हावे. यासाठी मी महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे. या महिनाभरामध्ये काम पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
- मुरलीधर मोहोळ, नगरसेवक.

Web Title: Maharshi Keshav Karve Statue