

PNE26W61552
सोलापूर ः महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना मान्यवर.
उत्सवाचा खर्च विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देणार
कोळी समाजाचा निर्णय; दुष्काळी स्थितीमुळे महर्षी वाल्मिकी जयंती साधेपणाने साजरी करणार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन कोळी समाजाने यंदा महर्षी वाल्मिकी जयंती साधेपणाने साजरी करण्याचे ठरवले आहे. उत्सवासाठी होणारा खर्च विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय घेत कोळी समाजाने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गणेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समितीने हा निर्णय घेतला. कोळी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तींचे वाटप करण्यात आले. सात रस्ता येथे महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची स्थापना करून विधिवत पूजा व आरती करण्यात आली.
राज्यात शेतकरी आणि सामान्य नागरिक दुष्काळामुळे अडचणीत असताना उत्सवावर मोठा खर्च करणे योग्य नाही. त्याऐवजी तोच निधी समाजातील गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरल्यास महर्षी वाल्मिकी यांना खरी आदरांजली ठरेल, असे गणेश कोळी म्हणाले. समाजातील विद्यार्थी हेच भविष्य आहेत. त्यांना शैक्षणिक साहित्य, फी भरण्यासाठी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी संजय कोळी, कपिल कोळी, भारती कोळी, सुधाकर सुसलादी, नागेश कोळी, दत्ता कलादगी, अप्पू शेडगुळ, देविदास वाघमारे, शांतप्पा कोळी, मनोज कामनुरकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.