

Residents Suffer Due to Contaminated Water Supply in Maharshinagar
Sakal
स्वारगेट : स्वारगेट पाणी पुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या महर्षीनगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून नळांमधून येणारे पाणी दूषित स्वरूपात येत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. आठवडाभरापासून सुरू असलेली ही समस्या आता अधिक वाढली असून पाणी पूर्णपणे अस्वच्छ, काळपट, गढूळ दिसत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. जुलै २०२५ मध्ये हा प्रश्न उद्भवल्यावर सकाळने यावर प्रकाश टाकत जीवनदायी की जीवघेणे? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.