Peanut, Soar, Sago and Varai
sakal
मार्केट यार्ड - महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासासाठी लागणाऱ्या भगर, साबुदाणा आणि शेंगदाणा या पदार्थांना मागणी वाढली आहे. मागणी जास्त असल्याने शेंगदाण्याच्या भावात क्विंटलमागे दोन ते तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे, तर मागणीच्या तुलनेत आवक जास्त होत असल्यामुळे घाऊक बाजारात साबुदाणा व भगरीचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.