मंचर येथील स्कूलमध्ये 
विज्ञान-गणित-भाषा प्रदर्शन

मंचर येथील स्कूलमध्ये विज्ञान-गणित-भाषा प्रदर्शन

Published on

मंचर, ता. ४ : येथील रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे विज्ञान, गणित व भाषा प्रदर्शन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांमुळे व मॉडेल्समुळे उपस्थितांची दाद मिळाली.
प्रदर्शनाचे उद्‍घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य राजाराम बाणखेले, मुख्याध्यापक संजय दवंडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चैत्राली मोरे, शिल्पा खुडे, प्रा. सुहास खेडकर व मुख्याध्यापिका चित्रा बांगर यांच्या हस्ते झाले. डॉ. मधुरा शेटे व डॉ. सुचिता शेटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील विविध प्रयोग, पर्यावरणपूरक प्रकल्प, गणितातील संकल्पनांवर आधारित मॉडेल्स तसेच भाषा विषयातील सर्जनशील उपक्रम सादर केले. प्रत्येक सादरीकरणामध्ये विद्यार्थ्यांची मेहनत, संशोधनवृत्ती व आत्मविश्वास प्रकर्षाने जाणवत होता. यावेळी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा. व्ही. एम. कोल्हे, एन. एस. बांगर, शिक्षिका ललिता खांडगे, डॉ. उमेश पाटील व प्रा. निकिता काळे यांनी परीक्षण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर सूचना दिल्या.
मनीषा सोमवंशी यांनी सूत्रसंचालन केले. पूजा ढोले, सोनाली रणदिवे, सोनल पारेख व आशा दाते यांनी नियोजन केले. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com