काटेगावच्या गांधी विद्यालयाचे उत्तुंग यश

काटेगावच्या गांधी विद्यालयाचे उत्तुंग यश

Published on

BAR26B13070
बार्शी : काटेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक व शिक्षक.
---
काटेगावच्या गांधी विद्यालयाचे उत्तुंग यश
बार्शी शहर : काटेगाव (ता. बार्शी) येथील महात्मा गांधी विद्यालयातील एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला. या परीक्षेत राघव मुंडे, समीक्षा सांगळे, सत्यजित शिंदे, तेजस गायकवाड, श्रेया गवळी, रिदा शेख, विद्या ढोणे, अनिकेत गायकवाड, अंजली किरण राडे, सोहम मुंडे, मृण्मयी खराडे व स्वराज काळे या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच इतर विद्यार्थ्यांनीही या यशातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रम आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com