Teachers Reunion : विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरुजनांसाठी माजी विद्यार्थ्यांचा अनोखा पुढाकार; १९८० ते १९९० दशकातील शिक्षकांचा स्नेहमेळावा, १०० जणांच्या उपस्थितीत आठवणींना उजाळा

Teachers Reunion | Mahatma Gandhi Vidyalaya Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील १९८० ते १९९० दशकातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तब्बल ४० वर्षांनी स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आले. जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुशिष्य नात्यातील ऋणानुबंध पुन्हा फुलले.
Teachers Reunion | Mahatma Gandhi Vidyalaya Uruli Kanchan

Teachers Reunion | Mahatma Gandhi Vidyalaya Uruli Kanchan

esakal

Updated on: 

सुनील जगताप

उरुळी कांचन, ता.२७ :-आयुष्यात अनेक माणसे भेटतात, अनेक नाती निर्माण होतात मात्र आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या गुरुजनांचे ऋण आणि त्यांच्या प्रेमळ आठवणी मनाच्या कोपऱ्यात कायमस्वरुपी जपल्या जातात.शिक्षकांनी दिलेले ज्ञान,संस्कार आणि जीवनाची दिशा यांची परतफेड कधीच होऊ शकत नाही असे प्रतिपादन येथील मेमाणे फार्मचे संस्थापक किशोर मेमाणे यांनी केले.ते याच गुरुऋणाची जाणीव आणि कृतज्ञतेची भावना मनात ठेवून महात्मा गांधी विद्यालय,उरुळी कांचन येथील सन १९८० ते १९९० या दशकातील गुरुजनांच्या स्नेहमेळाव्यात आयोजक म्हणून बोलत होते.हा मेळावा भावनिक आणि संस्मरणीय ठरला.

Loading content, please wait...