
मुंबई : राज्य सरकारने २१ एप्रिल रोजी पुण्यातील धर्मादाय रुग्णालयांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची सक्ती करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्या याचिकेची दखल घेऊन, उच्च न्यायालयाने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह ११ रुग्णालयांना नुकताच तात्पुरता दिलासा दिला. न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली नसली तरी निर्णयाची सक्ती करण्यापूर्वी रुग्णालयांशी सल्लामसलत गरजेचे होते, असे निरीक्षणही नोंदवले.