प्राथमिक शाळेतील महात्मा फुले उद्यानाचे उदघाटन
MLG26B03191
माळीनगर (ता. माळशिरस) : महात्मा फुले उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी अजय गिरमे, पृथ्वीराज भोंगळे, ज्योती लांडगे व इतर.
.....
माळीनगरमध्ये महात्मा फुले उद्यानाचे उद्घाटन
..........
माळीनगर : माळशिरस तालुक्यातील गट नंबर दोन येथील प्राथमिक शाळा क्रमांक तीनमध्ये विद्यार्थ्यांसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या महात्मा फुले उद्यानाचे उद्घाटन दि. सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजय गिरमे, खजिनदार ज्योती लांडगे, संचालक पृथ्वीराज भोंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी या शाळेचे माजी विद्यार्थी प्रा. डॉ. गणेश गोरख धायगुडे यांना पीएचडी मिळाल्याबद्दल व अश्विनी कैलास निकम यांची कृषी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल उभयतांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. संजय जाधव, जितेंद्र लांडगे, समीर लोणकर, जयसिंह कांबळे, राजेंद्र भोसले उपस्थित होते. मुख्याध्यापिका ललिता नागटिळक यांनी प्रास्ताविक केले. स्मिता म्हेत्रे व उज्वला देवकाते यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण खरात, गौरी शिंदे, वंदना बंडगर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. वैजिनाथ भोसले यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

