
पुणे : एकीकडे महाराष्ट्र सरकार राज्यातील सर्वच नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार ‘महात्मा फुले जन आरोग्य’ योजना संलग्न असलेल्या रुग्णालयांतून मोफत देण्याची घोषणा करते तर, दुसरीकडे कागदपत्रांअभावी खरे गरजवंतच या योजनेपासून वंचित राहत आहेत. यामध्ये रस्त्यावरील बेवारस रुग्ण, निराधार किंवा भिक्षेकरी तसेच मनोरुग्णालयातील रुग्ण यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी ‘महात्मा फुले’ योजनेतून उपचाराबाबत धोरण आखले जावे, अशी मागणी होत आहे.