महात्मा फुले भाजी मंडईचा पुनर्विकास करण्यासाठी पाठपुरावा करणार : मुक्ता टिळक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पुणे : महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी कसबा मतदारसंघातल्या विविध भाजी मंडईमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. यावेळी नागरिकांशी बोलताना त्या भागातील अडचणी समजून घेऊन तेथील नागरिक व व्यापारी बंधूंशी चर्चा केली व विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

पुणे : महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी कसबा मतदारसंघातल्या विविध भाजी मंडईमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. यावेळी नागरिकांशी बोलताना त्या भागातील अडचणी समजून घेऊन तेथील नागरिक व व्यापारी बंधूंसह चर्चा केली व विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

महात्मा फुले भाजी मंडईमध्ये बोलताना, व्यापारी बंधू व भगिनींनी विविध प्रश्नांवर मुक्ता टिळक यांचे लक्ष वेधले. यावेळी पार्किंग, वाहतूक, जागेचा प्रश्न या विषयावर पाठपुरावा करू असे प्रतिपादन टिळक यांनी केले. 

यावेळी स्थानिक नगरसेवक मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे, नगरसेवक हेमंत रासने, गायत्री खडके, सम्राट थोरात, विजायलक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, अजय खेडेकर, सरचिटणीस प्रमोद कोंढरे ,छगन बुलाखे, संजय देशमुख, राजू परदेशी प्रभागचे अध्यक्ष निलेश कदम, कीर्तन जगदाळे, दिलीप पवार, राजेंद्र काकडे, जयसिंग राजपूत यांच्यासह कसबा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahatma Phule to pursue redevelopment of vegetable market said Mukta Tilak maharashtra Vidhan Sabha 2019