Mahavitaran : महावितरणचा पायाभूत सुविधांसाठी २००० कोटींचा आराखडा तयार

भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याची पूर्तता करण्यासाठी सध्याच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करण्याची गरज आहे.
Mahavitaran
Mahavitaransakal

पुणे - पुणे झोनमधील वाढत्या लोकसंख्येला सुरळीत वीजपुरवठा करता यावा, यासाठी सध्याच्या यंत्रणेचे सक्षमीकरण आणि नव्याने पायाभूत सुविधा करण्यासाठी दोन हजार ६०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत स्मार्ट मिटरींगसाठी एक हजार ७०० कोटी, वीजगळती रोखण्यासाठी ३५१ कोटी आणि आधुनिकीकरणासाठी ५५८ कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत.

भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याची पूर्तता करण्यासाठी सध्याच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने ३९ हजार ६०२ कोटींचा सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) हाती घेतली आहे.

त्यासाठी आराखडा तयार केला असून, पुणे झोनसाठी दोन हजार ६०० कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

कोणती कामे करणार?

या योजनेतून पुणे झोनमध्ये १४ नवीन सबस्टेशन, सात नवीन स्विचिंग स्टेशन, दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर (रोहित्र), ११ व २२ केव्ही क्षमतेचे एक हजार २१८ नवीन वितरण ट्रान्सफॉर्मर, ७३८ वितरण ट्रान्सफॅर्मरची क्षमतावाढ, दोन हजार ९९४ नवीन फिडर पिलर, एक हजार ६३० नवीन लघु व उच्चदाब फिडर आणि १६२ फिडर वेगळे करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय २०९ कोटी ९९ लाखांची अन्य कामे करण्यात येणार आहेत.

योजनेचे उद्दिष्ट काय?

वीजग्राहकांना दर्जेदार आणि वाजवी किमतीत वीजपुरवठा करणे, पुढील आर्थिक वर्षापर्यंत तांत्रिक व वाणिज्यिक हानी १२ ते १५ टक्क्यांपर्यंत कमी करणे, सरासरी प्रति युनिट वीजपुरवठ्यावर होणार खर्च आणि त्यापोटी प्रति युनिट मिळणारा महसूल यातील तफावत शून्यावर आणणे ही योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

...यांचा पुणे झोनमध्ये समावेश?

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, मुळशी, वेल्हा, हवेली, खेड, मावळ, जुन्नर आणि आंबेगाव यांचा समावेश होतो. पुणे झोनमध्ये ३५ लाख १४ हजार सर्व प्रकाराच्या उच्च व लघुदाब, घरगुती, वाणिज्यिक, सार्वजनिक आदी सर्वच प्रकारांच्या ग्राहकांचा समावेश होतो. पुणे झोन म्हणून महावितरणाला सुमारे दीड हजार कोटींचा महसूल जमा होतो.

आरडीएसएस योजनेस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे झोनमध्ये सुमारे दोन हजार ६०० कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांसाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्याची वीजयंत्रणा सक्षम करणे, तिचे आधुनिकीकरण करणे आणि नव्याने पायाभूत सुविधा उभारणे या कामांचा समावेश आहे.

- राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडळ, महावितरण

  • पुणे परिमंडळाची विजेची रोजची मागणी - ३५०० एमव्हीए

  • वीज उपकेंद्रांची स्थापित क्षमता - ८२०० एमव्हीए

  • ‘आरडीएसएस’मुळे क्षमतेत होणारी वाढ - १३५ एमव्हीए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com