Mahavitaran: महावितरणच्या वीज सेवांचा डिजिटल धमाका! बिल पाहणे, भरने आणि तक्रार नोंदवणे आता व्हॉट्सॲपवर शक्य
Mahavitaran WhatsApp: पुणे वसाहतीत महावितरणने ग्राहकांसाठी व्हॉट्सॲपवर वीजबिल पाहणे, भरने, तक्रारी नोंदवणे आणि नवीन वीज जोडणीसाठी ऑनलाइन अर्ज तपासणे यासारख्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
पुणे : वीज ग्राहकांना आता वीजबिल पाहण्यापासून भरण्यापर्यंतच्या सर्व सुविधा महावितरणने ‘व्हॉट्सॲप’वर उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.