

विश्रांतवाडी: महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विश्रांतवाडी येथील एका नागरिकाला अजब अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. घरात वीज मीटर नसताना महावितरणने नोव्हेंबर २०२४ चा विजबिल ११,००० रुपये पाठवून ग्राहकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी निर्माण केली आहे.
धानोरी येथील परांडेनगरमधील रहिवासी गणेश महादू माकर (ग्राहक क्रमांक: 160235220650) यांच्याबाबतीत ही घटना घडली. महावितरणने त्यांच्यासाठी जरी वीज मीटर काढून घेतले असले तरी, १ वर्षांपासून वीजपुरवठा खंडित राहिला आहे. त्याचबरोबर, घरात वीज मीटर नसतानाही महावितरणने ८१ युनिट्सचे वीज बिल दाखवले आहे.