पूर्व हवेलीतील या गावातून महावितरण कंपनीने थकीत विजबिल केले वसूल

Mahavitaran
Mahavitaran

उरुळी कांचन - पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, लोणी काळभोरसह, कुंजीरवाडी, थेऊर, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, व परिसरातील गावांच्या हद्दीतून महावितरण कंपनीने थकीत विजबिल धारकांकडून सुमारे ८ कोटींपेक्षा जास्त रक्कम अवघ्या पंधरा दिवसात वसूल केली आहे. तर उर्वरित राहिलेल्या १० कोटींपेक्षा जास्त थकीत विजबिलाची रक्कम वसुली करण्याचे काम चालू असल्याची माहिती उरुळी कांचन चे उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे यांनी सकाळशी बोलताना दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जानेवारी २०२० पासून घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील थकीत विजबिल रक्कम सुमारे १८ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली होती. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीजबिल धारकांची थकीत वीजबिलाची रक्कम वसुली करण्यात आली नव्हती. महावितरणाकडून थकीत वीजबिलांची रक्कम वसुली करण्याचे आदेश १२ मार्च २०२१ रोजी  देण्यात आले होते. त्यानुसार पूर्व हवेलीत थकीत वीजबिलांची वसुली करण्याचे काम चालू झाले. त्वयानुसार अवघ्या पंधरा दिवसाच्या आत पूर्व हवेलीतील थकीत वीज' ८ कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर उर्वरित १० कोटींपेक्षा जास्त थकीत विजबिलाची रक्कम ग्राहकांकडून लवकरच गोळा करण्यात येणार असल्याचे प्रदीप सुरवसे यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरण २०२० च्या कायद्यान्वये  शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वापरलेल्या थकीत वीजबिलात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पूर्व हवेलीत जानेवारी २०१५ ते आजपर्यंत कृषीपंपाची थकीत वीजबिलाची रक्कम सुमारे ९० कोटीपेक्षा जास्त आहे. शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलामध्ये  मिळालेल्या ५० टक्के सवलतीमुळे ४५ कोटीपेक्षा जास्त रक्कम भरावी लागणार आहे. 

थकीत वीजबिल ग्राहकांनी लवकर वीजबिल भरून महावितरण प्रशासनास सहकार्य करावे. तसेच चालू विद्युत बिलाचा भरणा न करणाऱ्या  ग्राहकांचा विद्युत बिल लवकर भरावे. अन्यथा त्यांचाही विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. 
- प्रदीप सुरवसे, उपकार्यकारी अभियंता, उरुळी कांचन.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com