Sunetra Pawar : राज्यातील आरोग्य सुविधा सुधारणेसाठी सर्वात जास्त निधी महायुती सरकारने दिला

राज्यातील आरोग्य सुविधा सुधारणांवर महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात भर दिला आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawarsakal

डोर्लेवाडी - राज्यातील आरोग्य सुविधा सुधारणांवर महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी पाच लाखांपर्यंत मोफत उपचारासह वैद्यकीय शिक्षण आणि औषध रोजगार विभागासाठी २५७४ कोटी रुपये तर सार्वजनिक आरोग्य विभागासाठी ३८२७ कोटी रुपयांची तरतूद राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राज्यातील आरोग्यसेवा भक्कम करण्यासाठी आजपर्यंतचा सर्वात जास्त निधी यंदा दिला असून ही सर्वसामान्यांसाठी आनंदाची बाब आहे. असे मत बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.

डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २.७६ कोटी खर्चाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी सुनेत्रा पवार बोलत होत्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव, दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, खरेदी-विक्री संघाचे संचालक ज्ञानदेव नाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक नवले, छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, माजी संचालक रमेश मोरे, दूध संघाचे संचालक श्रीपती जाधव, डोर्लेवाडीच्या सरपंच सुप्रिया नाळे उपसरपंच छबुबाई मदने, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे प्राचार्य अंकुश खोत, झारगडवाडीचे माजी सरपंच नितीन शेडगे, नितीन मासाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रेश्मा पाटील,रेश्मा खोमणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे कामही जोमात सुरू आहे. बारामतीसाठी १०० प्रवेश क्षमतेचे शासकीय नर्सिंग स्कूल सुरू होत आहे. ही बारामतीसाठी अभिमानाची बाब असून बारामतीतील महिला रुग्णालय हे ग्रामीण भागातील महिलांसाठी एक संजीवनी आहे. महिलांसाठी असणारे हे पहिलेच आगळे वेगळे रुग्णालय आहे की, ज्या रुग्णालयात सर्व उपचार मोफत होतात.असे काम फक्त बारामतीतच होऊ शकते.

बारामती सह पुणेकरांच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र रुग्ण सहाय्यता कक्ष उभारण्यात आला असून त्याद्वारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य समस्यांविषयी मदत आणि मार्गदर्शन केले जाते. डोर्लेवाडी येथे होणारे नवीन रुग्णालय हे पंचक्रोशीतील रुग्णांना वरदान असे ठरणार आहे.त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम दर्जेदार कसे होईल, याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

विकासकामांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट..

बारामती वरून निघाल्यानंतर डोलेवाडी हे गाव कधी आले ते कळालेच नाही. कारण ज्याप्रमाणे बारामती शहराचा विकास झालेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील गावांचाही रस्ते, शासकीय इमारती आदी मूलभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. गावातील वाड्या वस्त्यांवर देखील कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाल्यामुळे आता खेड्यांनाही शहराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटच्या तळागाळातील नागरिकांपर्यंत विकासाचा निधी कसा जाईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याने हे समाधानकारक चित्र पहावयास मिळाल्याचे गौरवोद्गार सुनेत्रा पवार यांनी काढले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, प्रा. अंकुश खोत, विनोद नवले यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मनोज खोमणे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com