

Women and Child Development Minister Aditi Tatkare launched the Mahila Unnati Wari 2026 initiative at Uruli Kanchan during the Ashadhi Wari.
Sakal
सुनील जगताप,
उरुळी कांचन : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसेच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने "महिला उन्नती वारी" उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अधिकाधिक महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा;महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी,असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.महिला व बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित "महिला उन्नती वारी २०२६" विशेष उपक्रमाच्या शुभारंभ आज उरुळी कांचन येथे त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.मंत्री श्रीमती तटकरे यांच्या हस्ते महिला व बाल विकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे दोन्ही पालखी मार्गावर जनजागृती करिता असलेल्या डिजिटल चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले.