महिमानगडाची मोजणी पूर्ण

महिमानगडाची मोजणी पूर्ण

Published on

गायरान नोंदीतून आता
बाहेर येणार महिमानगड

जगाच्‍या नकाशावर ‘गड’ नोंद होणार

गोंदवले, ता. ५ : शासकीय दरबारी गायरान म्हणून नोंद असलेल्या माण तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले महिमानगडची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता जगाच्या नकाशावर ‘गड’ म्हणून नोंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमोल एकळ फाउंडेशनने केलेली मोजणीची मागणी पूर्ण झाल्याने शिवप्रेमी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील महत्त्‍वाचा किल्ला असलेला महिमानगड दुर्लक्षित राहिला होता. या किल्ल्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी अमोल एकळ फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी अमोल एकळ यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. महिमानगडावर असलेले प्राचीन हनुमान मंदिर हे अनेकांचे प्रेरणा व श्रद्धास्थान आहे. मात्र, हा गड उपेक्षित राहिल्याने इतिहासाचे पुरावे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हा ऐतिहासिक वारसा जतन करून विकास करण्यासाठी गडावर सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना आता यशही येऊ लागले आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी पुरातत्त्व विभागाने किल्ल्याची व परिसराची पाहणी करून उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत. याशिवाय नुकतीच किल्ल्यावर वीज पोचल्याने प्राचीन मंदिर परिसरही उजळला आहे. संपूर्ण किल्ला व परिसराची गायरान म्हणून दप्‍तरी नोंद असल्याने अडचणी निर्माण होत होत्‍या; परंतु ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी महत्त्वाचा भाग असलेली किल्ल्याची मोजणी करावी, अशी मागणी अमोल एकळ फाउंडेशनने केली होती. या मागणीनुसार तहसीलदार विकास अहीर यांनी भूमी अभिलेख विभागाला मोजणीचे आदेश दिले होते. त्यानुसार भूमी अभिलेखचे उपअधीक्षक धनंजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिमानगड किल्ला उभा असलेल्या गट क्रमांक ३७२, ३७३, ५३९ या गटांची नुकतीच मोजणी करण्यात आली. त्यामुळे आता शासकीय दरबारी ‘किल्ले महिमानगड’ अशी नोंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या मोजणीवेळी भूमी अभिलेखचे नीलेश शेंडे, कासीम शाह, प्रसाद जाधव, मंडलाधिकारी विजय जाधव, ग्राम महसूल अधिकारी समाधान कुरडे, अमोल एकळ, सरपंच शामराव मोरे, उपसरपंच विजय चव्हाण, सदस्य बाबूराव धडांबे, माजी सैनिक दत्तात्रय धडांबे, मोहन तोडकर, अमोल कदम, रोहिदास कुचेकर, हणमंत जाधव, चंद्रकांत जाधव, बाळू गोसावी, जोतिराम जाधव, नंदकुमार धडांबे, रोहिदास धडांबे, विश्वनाथ जाधव, मानसिंग धडांबे, सुरेश कुचेकर, राज मुलाणी, हनुमंत दळवी, नारायण जाडकर, नंदकुमार कुचेकर, बिनू मुलाणी, सतीश धडांबे, राजू चव्हाण, आबा जाधव, बिनू गुजले, अशोक अवघडे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------------------------

‘‘ऐतिहासिक किल्ले महिमानगडाची मोजणी झाल्याने किल्ले संवर्धन होण्यात अडचणी दूर होणार आहेत. शिवाय पर्यटनालाही चालना मिळणार आहे. जगाच्या नकाशावर ‘गड’ म्हणून नोंद होणार असल्याचा खूप आनंद आहे.’’
- अमोल एकळ,
अध्यक्ष, अमोल एकळ फाउंडेशन, महिमानगड
-------------------------------
छायाचित्र :.........02546
महिमानगड : ऐतिहासिक महिमानगड व परिसराच्‍या मोजणीप्रसंगी उपस्थित अधिकारी व ग्रामस्थ. (फिरोज तांबोळी : सकाळ छायाचित्रसेवा)
............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com