ग्रामपंचायत निधी आणि लोकवर्गणीतून महूद येथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ; महूद ग्रामपंचायतचा सुरक्षिततेसाठी मास्टरस्ट्रोक
MHD26B05091
महूद (ता. सांगोला) : येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे पोलिस चौकीत केलेले संकलन.
महूद ग्रामपंचायतीचा सुरक्षेसाठी डिजिटल ‘मास्टरस्ट्रोक’
..........
ग्रामपंचायत अन् लोकवर्गणीतून दहा अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
.........
महूद, ता. २६ : ग्रामस्थांची सुरक्षितता आणि गावातील शिस्त अधिक बळकट करण्यासाठी महूद ग्रामपंचायत अन् लोकवर्गणीतून गावात दहा अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे महूद गाव आता डिजिटल देखरेखीखाली आले असून, यामुळे आता गुन्हेगारीला लगाम बसण्यासोबतच अनेक नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठी मदत होणार आहे.
महूद येथे सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत यासाठी येथील आपले महूद सामाजिक परिवार आणि सीसीटीव्ही ग्रुपच्या माध्यमातून यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. या ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी यासाठी लोकवर्गणी केली आहे. त्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या निधीतून होऊ शकते अशी माहिती घेऊन त्यांनी महूद ग्रामपंचायत शासनाकडे याबाबत आग्रह धरला. ग्रामपंचायतीनेही ग्रामनिधीतून यासाठी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि दानशूर ग्रामस्थांच्या पुढाकाराने राबवलेल्या या प्रकल्पामुळे गावाच्या मुख्य प्रवेशद्वारांसह, वर्दळीचे चौक, पवारवाडी चौक, अकलूज चौक, ग्रामपंचायत कार्यालय, बाजारतळ अशा विविध महत्त्वाच्या सार्वजनिक दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचे संकलन येथील ग्रामसचिवालयात असलेल्या पोलिस चौकीमध्ये केले आहे.
कोट
गावात सीसीटीव्ही बसविणे आवश्यक असल्याचे मत सर्वच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या कामासाठी सर्वांनी मान्यता दिल्यामुळे हे काम तत्काळ करण्यात आले.
- बाळासाहेब शिंदे, ग्रामविकास अधिकारी, महूद
कोट
सीसीटीव्ही ग्रुपच्या माध्यमातून जागृत युवक एकत्र आले. त्यांनी ही संकल्पना दानशूर व्यक्तीने समोर नेली. त्याला लोकांचा सक्रिय पाठिंबा मिळाला, त्यामुळे हे काम यशस्वी झाले.
- दिलीप केसकर, सदस्य, आपलं महूद सामाजिक परिवार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

