पुण्याहून कोकणला जाताय? मग, सावधान!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

पिंपरी चिंचवड व पुण्याहून मुळशी तालुक्यातून कोकणात जाणारा कोलाड पुणे रस्ता ताम्हिणी घाटात निवे गावाजवळ पुन्हा खचला असून त्या ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली असल्याचे पौड पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवटे यांनी सांगितले. 

हिंजवडी : पिंपरी चिंचवड व  पुण्याहून मुळशी तालुक्यातून कोकणात जाणारा कोलाड पुणे रस्ता ताम्हिणी घाटात निवे गावाजवळ पुन्हा खचला  आहे. त्या ठिकाणी एकेरी वाहतूक बंद करण्यात आली असल्याचे पौड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवटे यांनी सांगितले. 

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता थोडासा खचला होता, त्यात मागील दोन दिवसांच्या पावसामुळे आणखी भर पडली असून रस्त्याला मोठी लांबलचक भेग पडली आहे. अवजड वाहने गेल्यास अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी ऐकेरी वाहतूक सुरू केली असून फक्त एका बाजूनेच दुचाकी व कार सारखी चारचाकी वाहने जाऊ शकतात. अस पोलिसांच म्हणणं आहे. त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहनांनी व कारचालकांनी रात्रीचा प्रवास टाळावा असे आवाहन पौडचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले आहे. 

शासनाच्यावतीने हा रस्ता रात्रीच्या वापरासाठी बंद करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण करण्याचे काम सुरू असून पावसाळा उघडताच हे काम सुरू होईल अशी अपेक्षा पोलिसांना असली तरी खचलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात कोकणात जाणाऱ्या वाहनांची गैरसोय होणार हे निश्चित.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The main road in the Tamhini Ghat was further damaged