Court
sakal
पुणे - पक्षकाराची सही आणि समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र नसणे, पतीच्या उत्पन्नाचा आवश्यक तपशील दिला नाही तसेच पोटगीच्या मागणीला पुरेसा कायदेशीर आणि तथ्यात्मक आधार नसल्याने कौटुंबिक न्यायालयाने पत्नीचा दरमहा ६० हजार रुपये अंतरिम पोटगी मिळण्याचा दावा फेटाळला. तसेच, कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणातील तडजोडीच्या अटींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पतीला द्यावेत, ही पत्नीची मागणीही न्यायालयाने नामंजूर केली. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. एन. रुखमे यांनी हा आदेश दिला.