साप्ताहिक समालोचन.... छत्रपती संभाजी नगर

साप्ताहिक समालोचन.... छत्रपती संभाजी नगर
Published on: 

साप्ताहिक समलोचन...
-----
माजलगावात शेतीमालाची
आवक घटली, दर तेजीत
-----
संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
माजलगाव, जि. बीड ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे बाजरी, उडीद, हरभरा, मूग, तूर, ज्वारी, सोयाबीन आणि गहू या शेतीमालाच्या दरात तेजी दिसून येत आहे.
बाजार समितीच्या सूत्रांनुसार, सोयाबीन काढणीच्या हंगामात दरवर्षी होणाऱ्या आवकेच्या तुलनेत यंदा अल्प आवक होत आहे. दुष्काळाचे संकट किती गंभीर आहे, याची प्रचिती बाजारात येणाऱ्या शेतीमालाच्या आवकेवरून येत आहे.
माजलगाव बाजार समितीत १९ ते २४ ऑक्टोबरदरम्यान बाजरीची एकूण सुमारे ३३६ क्विंटल आवक झाली. बाजरीला सरासरी ३ हजार १०० ते ३ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. उडदाची केवळ एकदा चार क्विंटल आवक झाली. त्याला आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
हरभऱ्याची एकूण २६ क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. पांढऱ्या तुरीची एकूण ३० क्विंटल आवक झाली. तुरीला सरासरी ८ हजार ८०० ते ९ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. ३१ ऑक्टोबरला तुरीला कमाल १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. गव्हाची एकूण १८४ क्विंटल आवक झाली. गव्हाला सरासरी २ हजार ८२५ ते ३ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

ज्वारीला एकदा उच्चांकी दर
माजलगाव बाजार समितीत रब्बी ज्वारीची आवक तुलनेने कमी आहे. गत आठवड्यात ज्वारीची एकूण ४८४ क्विंटल आवक झाली. ज्वारीला सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. २४ ऑक्टोबरला ९५ क्विंटल आवक झालेल्या ज्वारीपैकी सुमारे १० क्विंटल ज्वारीला ८ हजार १०० रुपये प्रति क्विंटलचा चांगला दर मिळाला. त्या दिवशी ज्वारीचा किमान दर सुमारे २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

मुगाचे दर आठ हजारांच्या पुढे
माजलगाव बाजार समितीत मुगाची केवळ ३२ क्विंटल आवक झाली. मुगाला ८ हजार २०१ ते ९ हजार ७५५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. २१ आणि २४ ऑक्टोबर रोजी मुगाचे कमाल दर ११ हजार रुपये प्रति क्विंटलच्या पुढे होते.

सोयाबीनची १४ हजार ८०६ क्विंटल आवक
माजलगाव बाजार समितीत गत आठवड्यात सोयाबीनची १४ हजार ८०६ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला सरासरी ६ हजार ७०० ते ६ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com