पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तसेच कोथरूडमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना जोरदार धक्का दिला. माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह येरवड्यातील माजी नगरसेवक संजय भोसले यांनी आज पुण्यात भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाकड भागाचे प्रतिनिधित्व केलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.