Drugs seized
sakal
पुणे - पुणे सीमाशुल्क विभागाने एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान कारवाई करून १९२ किलो अमली पदार्थ (हायड्रोपोनिक गांजा) आणि वनजीव तसेच वन्यऔषधी तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, बॅंकॉकमधून ‘हायड्रोपोनिक’ गांजाची पुण्यात तस्करी होत असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या नऊ महिन्यांत सुमारे ६१ कोटींची तस्करी उघड झाल्यामुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.