Pune Crime : पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त, सव्वाचार कोटींचे मेफेड्रोन जप्त

खराडी येथे अमली पदार्थासह पकडलेल्या दोन संशयितांपासून धागा पकडत पोलिसांनी थेट राजस्थानमध्ये धडक कारवाई केली.
Major Drug Bust Interstate Gang arrested

Major Drug Bust Interstate Gang arrested

sakal

Updated on

पुणे - खराडी येथे अमली पदार्थासह पकडलेल्या दोन संशयितांपासून धागा पकडत पोलिसांनी थेट राजस्थानमध्ये धडक कारवाई करीत मेफेड्रॉन (एमडी) तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त केली. या कारवाईत एक किलो ९६० ग्रॅम एमडी, रोख रक्कम, मोबाईल, चारचाकी वाहन आदी मिळून चार कोटी २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com