SIR
sakal
पुणे - मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेनंतर तयार झालेल्या प्रारूप मतदार यादीत पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण १४ लाख ८५ हजार (४२ टक्के) मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक मतदार हे हडपसर विधानसभा मतदारसंघातील असून ही संख्या २ लाख ९८ हजार इतकी आहे. तर सर्वांत कमी कसबा विधानसभा मतदारसंघातील असून ही संख्या ९२ हजार इतकी आहे.