
पुणे : मुळा मुठा शुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत औंध येथील जैवविविधता उद्यानात (बोटॅनिकल गार्डन) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जागा मिळविण्यासाठी महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. महसूल व वन विभागाने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ३० गुंठे जागेवरील बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइटचे आरक्षण उठवले आहे. आता ही जागा ताब्यात मिळून काम करण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी महापालिकेने अर्ज केला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर लगेच काम सुरू करता येणार आहे.