Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

पुणे महापालिकेच्या शहरी गरीब आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली पाच हजार रुपयांच्या आत मिळकतकर असला पाहिजे अशी अट प्रशासनाने टाकून लाभार्थ्यांची अडवणूक केली होती.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या शहरी गरीब आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली पाच हजार रुपयांच्या आत मिळकतकर असला पाहिजे अशी अट प्रशासनाने टाकून लाभार्थ्यांची अडवणूक केली होती. पण आज स्थायी समितीच्या बैठकीत ही अट रद्द करण्यात आली आहे. १ लाख ६० हजार रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com