Topcon Triton machine
sakal
मंचर - पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक नेत्रचिकित्सा सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने गाडे हॉस्पिटल व नेत्र रुग्णालयाने, मंचर (ता. आंबेगाव) येथे अत्याधुनिक ‘टॉपकॉन ट्रायटन स्वेप्ट सोर्स ओसीटी व अँजिओग्राफी’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. प्रथमच ओसीटी अँजिओग्राफी (OCTA) सुविधा उपलब्ध झाल्याने रेटिना, मॅक्युला तसेच डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे अधिक बारकाईने आणि आधुनिक पद्धतीने परीक्षण करणे शक्य होणार आहे.