
पुणे : राज्य सरकारने पशुसंवर्धन प्रशासनात मोठा बदल करत जिल्हा परिषदेकडील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पद रद्द केले आहे. यापुढे आता या पदाचे सर्व काम पशुसंवर्धनाच्या जिल्हा उपायुक्तांच्या माध्यमातून चालणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या मनुष्यबळाचा वापर प्रत्यक्ष दवाखान्यामध्ये होणार आहे.