मेजर शशिधरन नायर यांना अखेरचा निरोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

पुणे / खडकवासला - पाणावलेले डोळे... सुन्न करणारे वातावरण... अस्वस्थ मने... ‘अमर रहे, अमर रहे’च्या घोषणा देत देशासाठी बलिदान देणारे मेजर शशिधरन नायर यांना आज वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचा मावसभाऊ आश्‍वत नायर याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. 

जम्मू-काश्‍मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडविलेल्या आयईडीच्या स्फोटात नायर यांना वीर मरण आले. आज सकाळी सातला 

खडकवासला येथील मुकाईनगर येथील कृष्णाई हाईट्‌स या त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथामध्ये वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी दुचाकीवरून तिरंगा घेतलेली मुले अंत्ययात्रेच्या पुढे होती. खडकवासला ते नांदेड असे दोन किलोमीटर नागरिक पायी चालत आले. या वेळी परिसरातील नागरिकांनी दुकाने बंद ठेवली होती. अंत्ययात्रा जात असताना पानशेत रस्त्यावरील वाहतूक सकाळी दहापर्यंत बंद ठेवली होती. 

नायर यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांचे कुटुंबीय, नातेवाइकांसह हजारो पुणेकरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, खडकवासला सरपंच सौरभ मते, किरकटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे, त्रिशक्ती माजी सैनिक संघटनेचे मधुकर पायगुडे, माजी सैनिक नानाभाऊ मते, बाळकृष्ण मते, ज्ञानेश्वर खानेकर, मधुकर खिरीड, रुपाली चाकणकर, जयश्री पोकळे यांच्यासह पोलिस अधीक्षक संदीप पाटील, तहसीलदार सुनील कोळी, पोलिस उपअधीक्षक सुहास गरुड, हवेलीचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके आदींनी आदरांजली वाहिली.  

या वेळी ‘अमर रहे, अमर रहे, मेजर शशी नायर अमर रहे’, ‘मेजर शशी नायर झिंदाबाद’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माताकी जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

Web Title: Major Shashi Dharan V Nair killed in Jammu and Kashmir