सप्तपदीने दिले तिला बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सप्तपदीने दिले तिला बळ

सप्तपदीने दिले तिला बळ

खडकवासला - लग्न ठरल्यानंतर तृप्ती पेंडा यांना मज्जारज्जूशी संबंधित गंभीर आजार आहे, ही बाब चाचण्यांमधून निष्पन्न झाली. सर्व आयुष्य त्यांना व्हीलचेअरवर खिळून राहावे लागेल, याचीही डॉक्‍टरांनी कल्पना दिली. मात्र मेजर शशिधरन नायर यांनी ठरलेले लग्न न मोडता, त्यांच्याशीच विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याशी सुखाचा संसार केला. सर्व आघाड्यांवर त्यांना सांभाळून घेत, प्रेमाचा आधार दिला. मेजर नायर यांच्या अंत्यसंस्कारावेळी अनेकांनी त्यांच्या माणुसकीचा हा पैलू आज उलगडून दाखवला.

शशिधरन व तृप्ती यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तृप्ती पेंडा या मूळच्या तेलुगू आहेत. लग्नापूर्वीपासून त्या पिंपरी- चिंचवड परिसरात राहतात. तेथील महाविद्यालयात त्यांनी संगणक अभियंत्याचे शिक्षण घेतले, तर मेजर शशिधरन हे मल्याळी आहेत. त्यांचे पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण झाले होते. लग्न ठरल्यानंतर दोघेही भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होते. 

 मात्र त्याच वेळी, तृप्ती यांना मज्जारज्जूशी संबंधित आजार झाला. मात्र, शशिधरन यांनी माणुसकीचा विचार करीत ‘माझे तिच्याशी लग्न ठरले आहे, त्यामुळे तिची जबाबदारी ही माझीच आहे, असे म्हणत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांचे लग्न झाले. लग्नाअगोदर व नंतरही त्यांनी तिच्यावर उपचार केले. 

मात्र त्यात फारसे यश आले नाही. त्यांना दिव्यांगत्व आले. त्यामुळे त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत आहे. तृप्ती यांच्यातील आत्मविश्‍वास जागविण्यासाठी शशिधरन सीमेवर तैनात असले, तरी ते नियमित विचारपूस करीत असत. त्यामुळे तृप्ती यांना मोठा मानसिक आधार मिळत असत.

मात्र शशिधरन देशासाठी हुतात्मा झाले आणि संसाराचा डाव अर्ध्यावर सोडून गेले, असे म्हणत नातेवाईक व मित्रमंडळींनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

Web Title: Major Shashidharan Nair Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top