
मंचर : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील मेजर सुनील सोनबापू शिंदे (वय ३९) यांचे शनिवारी (ता. ७) पुण्यातील लष्करी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून, रविवारी(ता.८) सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.