
मंचर : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील सुपुत्र मेजर सुनील सोनबापू शिंदे यांना आज सायंकाळी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. भारतीय लष्कराच्या वतीने त्यांना ध्वजाच्छादन व तीन तोफांची मानाची सलामी देण्यात आली. गावात शासकीय इतमामात झालेला हा पहिलाच अंत्यसंस्कार असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.