पुणे : अतिरिक्त वित्ताची करा स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक

फॅमिली ऑफिस समिटमध्ये तज्ज्ञांचा सल्ला
Startup
Startupsakal

पुणे : उद्योजक कुटुंबीयांच्या वित्ताचे व्यवस्थापन करणाऱ्या फॅमिली ऑफिसेसने आता स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीलाही प्राधान्य द्यायला हवे, असा सूर ‘जितो कनेक्ट २०२२’मध्ये आयोजित फॅमिली ऑफिस समिटमध्ये उमटला. मार्केटयार्ड येथे आयोजित या चर्चासत्रात मेफेझेलिया फॅमिली ऑफिसचे प्रमुख अमोल साठे, एलएनबी ग्रुपच्या फॅमिली ऑफिसचे संचालक अमित मेहता, आरएएवाय ग्लोबल इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक अमित पटनी सहभागी झाले होते. वॉटरफिल्ड ॲडव्हायझर्सचे कार्यकारी संचालक विवेक राजारामन यांनी चर्चाप्रवर्तक म्हणून जबाबदारी पार पडली. फॅमिली ऑफिसेस कंपन्यांची आदर्श कार्यप्रणाली, तसेच त्यांच्याकडे असलेल्या उद्योगांच्या वित्ताची गुंतवणूक आणि बड्या उद्योजक कुटुंबांनी आपले वारसदार निवडताना घ्यावयाची काळजी, अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.

पटनी म्हणाले, ‘‘स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीसाठी प्रगल्भ दृष्टिकोन आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज आहे. आम्ही तर स्वतःचे निधी सुरू केले. रचनात्मक गुंतवणूक आणि योग्य स्टार्टअप्सची निवड केली तर निश्चित परतावा मिळेल. तसेच अशा स्टार्टअप्समुळे सध्या काय चालले आहे. बाजारात नवीन काय आलेय, हे शिकायला मिळेल.’’

प्रत्येक फॅमिली ऑफिसने स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्याची भूमिका मेहता यांनी मांडली. ते म्हणाले, ‘‘विविधांगी गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे. प्रत्येक दशकात परिस्थिती बदलत असून, जमिनीवरील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक हवी.’’ फॅमिली ऑफिसेस ही वित्ताचे संरक्षण करण्यासाठी असतात. त्यांनी मर्यादा समजून घेऊन गुंतवणूक करावी, असा सल्ला साठे यांनी दिला. गुंतवणूक केलेल्या स्टार्टअप्सचे सातत्याने मुल्यमापन करणे गरजेचे असल्याचे ही ते म्हणाले.

फॅमिली ऑफिस म्हणजे काय?

खाजगी संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी सल्लागार म्हणून कार्य करणारी संस्था म्हणजे फॅमिली ऑफिस होय. ज्या अती उच्च उत्पन्न गटातील उद्योजक कुटुंबांना सल्ला आणि सेवा देतात. श्रीमंत कुटुंबांचे आर्थिक व्यवस्थापन आणि गुंतवणूकी संदर्भात हे ऑफिसेस काम करतात.

उदाहरणार्थ : कंपीनीचे बजेटिंग, विमा, धर्मादाय देणे, संपत्ती हस्तांतरण आणि कर सेवा आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com