esakal | पुण्याला देशातील सर्वाधिक पर्यावरणपूरक शहर बनवणार: देवेंद्र फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

To make Pune the most environmentally friendly city in the country Said Devendra Fadnavis

''रखडलेल्या प्रकल्पांचा मला आढावा घेण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मला निमंत्रित केलं होतं. मी मुख्यमंत्री असताना विविध योजना मंजूर केल्या आहेत. 24 / 7 पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. नदी पात्रातील सुशोभिकरणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे'' अशी माहिती देवेंद्र फडणीवीस यांनी दिली. 

पुण्याला देशातील सर्वाधिक पर्यावरणपूरक शहर बनवणार: देवेंद्र फडणवीस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : अभय योजनेमुळे महापालिकेला मोठा पैसा जमा झालाय, इतर महापालिकेने ही योजना राबवावी. पुण्यात डिसेंबरपर्यंत आणखी 500 बसेसे धावतील ''अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गेल्या चार वर्षात शहराच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आज (गुरुवारी) त्यांनी महापालिका आयुक्तांसमवेत त्यांनी  बैठक घेतली. 

''रखडलेल्या प्रकल्पांचा मला आढावा घेण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मला निमंत्रित केलं होतं. मी मुख्यमंत्री असताना विविध योजना मंजूर केल्या आहेत. 24 / 7 पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. नदी पात्रातील सुशोभिकरणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे'' अशी माहिती देवेंद्र फडणीवीस यांनी दिली. 

महत्त्वाची बातमी : भयंकर व्हायरसेस आणि किटाणूंपासून अधिकारी कर्मचाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी मंत्रालयात आली ऍडव्हान्स मशीन

तसेच ते पुढे म्हणाले, ''मुळा मुठाचा जायका प्रकल्प फेब्रुवारीमध्ये टेंडर काढून जूनमध्ये काम सुरू केले जाईल, पुणे मेट्रोचा 21 किलोमीटरचा टप्पा यावर्षी सुरू केला जाणार आहे. पुणे मेट्रोच्या टप्पा 2 ला पुढील वर्षी निधी मिळेल यासाठी प्रयत्न करू'', असं देवेंद्र फडणीस म्हणाले.

राज्यपालांना विमानातून उतरवणं दुर्दैवी, हा तर पोरखेळ : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडमध्ये  झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी तिथे जात होते. उत्तराखंडसाठी प्रस्थान करत असताना त्यांच्या हवाई प्रवासास मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून परवानगी मिळाली नसल्याचं समजल्यानंतर त्यांना पुन्हा राजभवनात परतावं लागलं. यावरुन  देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका करुन रोष व्यक्त केला. 'राज्यपालांना विमानातून उतरवणे दुर्दैवी. हा पोरखेळ सुरु आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं मी असे सरकार मी पाहिलं नव्हतं, आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे, राज्यपाल संविधानिक पद आहे. सध्याचं सरकार अहंकारी सरकार आहे अशा शब्दात त्यांना सराकारवर टीका केली.....सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा

loading image
go to top