मलकापूर राजेंद्र यादव निवेदन

मलकापूर राजेंद्र यादव निवेदन

Published on

मलकापूरमध्ये अभय
योजनेला मुदतवाढ द्या

भाजपच्या राजेंद्र यादवांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मलकापूर, ता. १६ : येथील पालिका कार्यक्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफीबाबत अभय योजनेला मुदतवाढ द्यावी, असे निवेदन भाजपचे कऱ्हाड दक्षिण मध्य मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी मुख्याधिकारी कपिल जगताप यांना दिले.


निवेदनात म्हटले, की राज्यात नगरपरिषदा क्षेत्रात अधिनियमानुसार संकलित कर न भरलेल्या रकमेवर दरमहा दाेन टक्के व्याजाची शास्ती आकारली जाते. त्यामुळे मालमत्ताधारकांच्या एकूण थकबाकीत वाढ हाेते. त्यामुळे थकबाकी न भरल्याने नगरपरिषदेची वसुली होत नाही. ही बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. या अनुषंगाने शासनाने निर्णय घेत शास्तीमध्ये माफी देण्यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. ही माफी १९ मे २०२५ पर्यंतच्या थकबाकीदारांसाठी आहे.

थकबाकीदारांना ही मुदत संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या योजनेपासून अनेक मिळकतधारक वंचित राहणार आहेत. त्याचा परिणाम पालिकेच्या वसुलीवर होणार आहे. अभय योजना निर्णयात प्रस्ताव दाखल करून घेण्याची अंतिम मुदत दिलेली नाही. राज्यातील काही नगरपरिषदांनी ही मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. त्या पद्धतीने मलकापूर कार्यक्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफीबाबत अभय योजनेस ३१ मार्चअखेर मुदतवाढ द्यावी.
यावेळी नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती हणमंतराव जाधव, नियोजन सभापती सूरज शेवाळे, सचिन जगताप, शहाजी पाटील, दिगंबर माळी उपस्थित होते.
.....

A01388
मलकापूर : कपिल जगताप यांना निवेदन देताना राजेंद्र यादव, तेजस सोनवलेे, मनोहर शिंदे, हणमंतराव जाधव, सूरज शेवाळे.
.................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com