मलकापूर अशोकराव थोरात प्रसिद्ध पत्रक
भुयारी गटार योजनेची श्वेतपत्रिका काढा
मलकापूर पालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी; नागरिकांना द्यावी माहिती
मलकापूर, ता. ६ : शहरासाठी २०१२-१३ ला केवळ सेप्टी टँक पाणी वाहून नेणारी भुयारी गटर योजना मंजूर होऊन काम सुरू झाले. आजतागायत ही योजना अपुरी आहे. या ४३ कोटींच्या योजनेचा नेमका खर्च किती झाला? योजना अपुरी का आहे? याबाबत नागरिकांना माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी या योजनेची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्यासह नागरिकांनी पालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पत्रकातील माहिती अशी, मलकापूरसारख्या क्षेत्रफळाने मोठ्या असणाऱ्या शहरासाठी मैला वाहून नेणारी योजना असायला हवी होती. मात्र, तत्कालीन नगरपंचायत व सध्या पालिका प्रशासनाने मलकापूरसाठी भुयारी गटार योजना मंजूर केली. मात्र, ही योजना मैला वाहून नेणारी नसून, केवळ सेफ्टी टॅंकचे व सांडपाणी वाहून नेणारी आहे. या योजनेचे काम सुरू झाल्यापासून आजतागायत पूर्ण झाले नाही. ही योजना ४३ कोटींची होती. याशिवाय या योजनेसाठी नगरपंचायत व पालिकेने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून कर वसूल केला आहे, तरीही योजना अपूर्ण असून, सांडपाणी पूर्णपणे वाहून जात नाही. मिळकतींचे सांडपाणी जोडण्याचे चेंबर्स बरोबर नाहीत. योजना पूर्णपणे अयशस्वी झाली आहे. त्यामुळे योजनेची तांत्रिक परीक्षण करणे गरजेचे आहे. योजनेवर आतापर्यंत किती खर्च झाला? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे भुयारी गट योजनेची श्वेतपत्रिका काढावी व नागरिकांना माहितीसाठी उपलब्ध करावी, अशी मागणी श्री. थोरात यांच्यासह काहींनी पालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्यासह सुधाकर शिंदे, संजय तडाके, अमोल थोरात, हणमंत पुजारी यांच्या स्वाक्षरी आहेत.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

