

मलकापूरला एकल महिलांची सर्वेक्षण मोहीम
योजनांचा सुलभपणे लाभ शक्य; पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन
मलकापूर, ता. २४ : शहरातील एकल महिलांची अद्ययावत व अचूक माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी पालिकेतर्फे विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. एकल महिलांची सामाजिक, आर्थिक स्थिती, त्यांना मिळत असलेल्या शासकीय योजनांचे लाभ, तसेच भविष्यात त्यांना आवश्यक असणाऱ्या शासकीय साहाय्याची माहिती या सर्वेक्षणातून संकलित करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामुळे पात्र महिलांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पालिकेला प्रभावीपणे नियोजन करता येणार आहे.
शहरातील एकल महिलांच्या गरजा, अडचणी आणि त्यांना उपलब्ध असलेल्या शासकीय सुविधांची वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण मानले जाते. सर्वेक्षणादरम्यान संबंधित महिलेची आवश्यक माहिती, तिने यापूर्वी कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे का? घेतला असल्यास संबंधित योजनांची नावे याबाबत माहिती संकलित केली जाईल.
अनेक पात्र महिला विविध शासकीय योजनांपासून अद्यापही वंचित असण्याची शक्यता आहे. अशा महिलांची माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यानंतर त्यांना पात्रतेनुसार योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही आणि मार्गदर्शन करणे सुलभ होईल. त्यामुळे केवळ माहिती संकलनापुरते मर्यादित न राहता, एकल महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांशी जोडण्याच्या दृष्टीनेही या मोहिमेला महत्त्व आहे.
त्यामुळे शहरातील पात्र एकल महिलांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन अचूक व संपूर्ण माहिती पालिकेला द्यावी, असे आवाहन केले आहे. महिलांनी सर्वेक्षणासाठी आवश्यक त्या कागदपत्रे, माहितीसह मलकापूर नगरपालिका दीनदयाळ अंत्योदय
योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व्यवस्थापन कक्ष, (कै.)भास्कररावजी शिंदे सांस्कृतिक सभागृह, विठ्ठलदेव हाउसिंग सोसायटी, रोटरी शाळेच्या पाठीमागे, मलकापूर यांच्याकडे जमा करावे.
.................
चौकट
...
शनिवारपर्यंत मुदत
पालिकेतर्फे सुरू केलेल्या या सर्वेक्षणाची अंतिम मुदत २९ ऑगस्टपर्यंत आहे. एकही पात्र एकल महिला सर्वेक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. परिसरातील पात्र एकल महिलांची माहिती सर्वेक्षण करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना देऊन नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असेही आवाहन केले आहे.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.