मलकापूर २७ नळ कनेक्शन तोडली
मलकापूरला ३५ लाख वसूल
नळ कनेक्शन बंदमुळे दाेन दिवसांत जमा
मलकापूर, ता. १५ : येथील पालिकेने कर वसुलीसाठी कारवाईची धडक मोहीम राबवली आहे. थकीत कर वसुलीसाठी पालिकेने आजअखेर २७ नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली आहे. दोन दिवसांपासून ही मोहीम अधिक गतीने सुरू आहे. या कारवाईपासून दोन दिवसांत १५ लाख थकीत पाणीपट्टी व २० लाख घरपट्टी असे ३५ लाख पालिका तिजाेरीत जमा झाले आहेत.
पालिकेने शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत. चोवीस सात नळ पाणी पुरवठा योजनेंतर्गत आठ हजार ९११ नळ कनेक्शनची संख्या आहे. त्यानुसार दोन कोटी ८६ लाख पाणीपट्टी रक्कम वसूल होणे अपेक्षित आहे. त्यापैकी आत्तापर्यंत सुमारे दोन कोटी २७ लाख म्हणजेच ८० टक्के पाणीपट्टी रक्कम वसूल झाली आहे. उर्वरित रक्कम वसुलीसाठी पालिकेने कारवाईचे धडक मोहीम सुरू केली आहे.
पाणीपट्टीबरोबरच मिळकतदारांच्या कर वसुलीवरही लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार घरपट्टीच्या वसुलीचे साधारणपणे सात कोटी ३७ लाखांचे उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत चार कोटी ९१ लाख म्हणजेच ६६ टक्के कर वसूल झाली आहे. पालिका हद्दीत २० हजार ५३ मिळकती आहेत. वेगवेगळ्या भागांसाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची पथके तयार केली आहेत. थकबाकीदारांना नोटीसा बजावल्या आहेत.
नळ कनेक्शन बंद करण्याच्या कारवाईसाठी सहाय्यक कर निरीक्षक मकरंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दोन पथके तयार केली आहेत. त्यात जगन्नाथ मुळे, उमेश खंडागळे, संतोष लोखंडे, आनंदा येडगे, शरद कदम, अधिक कदम, विजय लाखे यांचा समावेश आहे.
.............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

