जगभरातील लाखो नागरिकांचा जीव घेणाऱ्या हिवताप (मलेरिया) आणि डेंगीचे आता अचूक निदान होणार शक्‍य

Shrivastav and Vipin
Shrivastav and Vipin

पुणे - भारतातील हजारो, तर जगभरातील लाखो नागरिकांचा जीव घेणाऱ्या हिवताप (मलेरिया) आणि डेंगीचे आता अधिक अचूक निदान शक्‍य होणार आहे. निदानाबरोबरच हिवताप किंवा डेंगी तीव्र स्वरूपाचा आहे का, तो कोणत्या परजीवीमुळे झाला, याची माहिती सहज मिळणे शक्‍य झाले आहे. जगात प्रथमच मानवी प्रथिनांच्या वापरातून निदानाची पद्धत आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. 

आयआयटीच्या जैवविज्ञान व जैवअभियांत्रिकी विभाग आणि संख्याशास्त्र विभागाने कोलकता येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, बिकानेर येथील एस. पी. हॉस्पिटल आणि मुंबईतील डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल्सच्या सहकार्याने हे संशोधन केले आहे. प्रा. संजीव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली विपिन कुमार, संदीपन राय, शालिनी अग्रवाल आदींचे हे संशोधन ‘नेचर-कम्युनिकेशन बायोलॉजी’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिवतापाचे गांभीर्य का?
२०१९ मध्ये जगभरातील चार लाख तर भारतात ९ हजार लोकांचा मृत्यू हिवतापामुळे झाला. त्याचवर्षी देशातील ६३ लाख लोक हिवतापाने आजारी होते. भारतासह आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशियात हिवताप आणि डेंगीचा मोठा प्रादुर्भाव आहे. ग्रामीण, बांधकामाची जागा, झोपडपट्टी आदी भागांत हिवतापाचे रुग्ण जास्त आढळतात. 

संशोधनाची गरज का?
- हिवताप आणि डेंगीला कारणीभूत परजीवी स्वतःमध्ये बदल करतात.
- हिवतापाची तीव्रता आणि प्रकारांबद्दल निदान नाही
- परजीवींमधील प्रथिनांच्या आधारे निदान होते पण त्यात बदल होतोय.
- उपलब्ध निदान तंत्राची अचूकता कमी होत आहे.

काय आहे नवीन संशोधन ?
- बिकानेर, कोलकता आणि मुंबईतील हिवतापाच्या रुग्णांचे रक्त नमुन्यांच्या आधारे संशोधन
- हिवताप नक्की कोणत्या परजीवीमुळे झाला, त्याच्या प्रकाराच्या आधारे मानवी प्रथिनांची ओळख पटविण्यात आली
- प्लास्मोडिअम व्हायवेक्‍स परजीवीमुळे आढळणारी विशिष्ट प्रथिने, तसेच प्लास्मोडिअम फाल्सीपेरम आणि डेंगीमुळे तयार होणारी मानवी शरीरातील प्रथिनांची निश्‍चिती.
- एक प्रकारे हिवतापाचे निदान करण्यासाठी प्रथिनांची सारणीच तयार.

संशोधनाचे वैशिष्ट्ये काय?  
- परजीवींनी जरी बदल केले तरी मानवी प्रथिनांच्या आधारे निदान शक्‍य
- प्रथमच परजीवींच्या प्रकारानुसार मानवी शरीरातील प्रथिनांची सारणी उपलब्ध
- सौम्य, तीव्र आणि सेरेब्रल हिवतापाचे निदान शक्‍य

देशातील ८५ टक्के लोकसंख्येवर हिवतापाचा प्रादुर्भाव आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरातून सामान्य माणसाला परवडेल अशा किमतीत अचूक निदान किट तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हिवतापाबरोबरच डेंगूच्या निदानासाठीही याचा वापर होईल. 
- शालिनी अग्रवाल, संशोधक, आयआयटी मुंबई.

हिवताप कशामुळे होतो?
अनॉफिलस प्रकारातील मादी डासाने डंख मारल्यास हिवताप होतो. प्रामुख्याने प्लास्मोडिअम व्हायवेक्‍स आणि प्लास्मोडिअम फाल्सीपेरम नावाच्या परजीवींमुळे हिवताप होतो. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com