

Worship of Ajit Dada's image Akashkandil by Jay Pawar
Sakal
माळेगाव : लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी यंदाच्या दिवाळीत माळेगाव बुद्रुक (ता.बारामती) येथे अनोखा स्मृतिउपक्रम राबविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ॲड. राहुल तावरे मित्र परिवाराच्या वतीने अजितदादांची प्रतिमा असलेला भव्य आकाशकंदील उभारण्यात आला. आज या आकाशकंदिलाचे पूजन युवा नेते जय पवार यांच्या हस्ते भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी ‘एकच वादा... अजितदादा!’ आणि ‘अजितदादा अमर रहे!’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.