Baramati News : चिमुरडीच्या मृत्यूने माळेगाव परिसरात संताप; पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा ३० नोव्हेंबरला शाळेच्या प्रवेशद्वारावर गेट बंद आंदोलनाचा इशारा

Baramati News | Malegaon School Incident | Parents Demand Inquiry : माळेगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सरावादरम्यान सात वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याने पालक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. शाळा प्रशासनाच्या जबाबदारीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
 Malegaon School Incident | Parents Demand Inquiry

Malegaon School Incident | Parents Demand Inquiry

esakal
Updated on: 

माळेगाव : शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सरावादरम्यान शुक्रवार (ता. २७) रोजी सात वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद आज माळेगाव (ता.बारामती) परिसरात उमटले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालक व नागरिकांनी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित करत प्राचार्या, संस्थेचे सचिव व कोअर कमिटी सदस्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...