
पिंपरी : ‘काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर आम्हाला पुन्हा जेलमध्ये टाकतील,’ असे वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णी यांनी मंगळवारी (ता. १२) केले.सकल हिंदू समाजाच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात श्रमिक गोजमगुंडे यांनी कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेतली.